अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- राहुरी फॅक्टरी येथे नगर मनमाड मार्गावर श्रीरामपूर नाका परिसरात रस्ता ओलांडत असताना सायकल स्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे.
कंटेनर(क्रमांक एच.आर 55 -ए-जी 5288)याने धडक दिल्याने सायकलस्वार राम वाघ(रा.प्रसादनगर, वय-४५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघात समयी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पगारे, आदिनाथ कराळे व परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली.
फॅक्टरी येथील नाक्यावर वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खेळखंडोबा असून नेहमी अपघात होत असतात.
या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावि अशी मागणी होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम