अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- जामखेड तालुक्यातील आपटी, पिंपळगाव आवळा व वाघा परिसरात भरदिवसा घरफोड्या करुन तीन चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचा पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला होता.
मात्र, वाघा येथील ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगत याबाबत ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून फोन करुन ग्रामस्थांना सावध करत अखेर दुचाकीवरील तीन आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यामुळे वाघा ग्रामस्थांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या चोरीप्रकरणी आदित्य उर्फ सोंड्या गणेश पिंपळे (वय २०, रा. अशोक नगर, श्रीरामपूर, अहमदनगर), प्रदीप उर्फ चक्क्या चंद्रकांत काळे (वय २१) व बाबू फुलचंद काळे (वय २४, दोघेही रा, सदाफुले वस्ती, जामखेड) अशा तीन आरोपींना पकडण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, १५ जानेवारीला सकाळी फिर्यादी गणेश मधुकर ढगे (रा. पिंपळगाव आवळा) हे आपल्या घरातील सर्वजण सकाळी दहा वाजता घराला कुलूप लावून शेतात गेले होते.
यानंतर त्यांचे वडील दुपारी पावनेदोन वाजता घरी आले आसता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. तसेच घरातील रोख रक्कम २५ हजार रुपये व ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला असल्याचे फिर्यादी गणेश ढगे यांच्या लक्षात आले.
फिर्यादी यांनी गावात आणखी माहिती घेतली असता गावातील हबीब बाबुलाल शेख, सय्यद नबीलाला शेख, सलिम नबीलाला शेख व आपटी येथील सावकार साहेबराव जगदाळे, मिलिंद सावकार जगदाळे,
किरण अजिनाथ खुपसे यांच्या घरीदेखील चोरी झाली असून, त्याचा देखील सोन्या-चांदीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला असल्याचे लक्षात आले.
यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा त्याचदिवशी सव्वातीन वाजता आपला मोर्चा वाघा गावाकडे वळवला. या तीन चोरट्यांनी दुसरे फिर्यादी सुमंत मारुती जगदाळे, (रा. वाघा) यांच्या घराकडे वळवळा फिर्यादी देखील घराला कुलूप लावून शेतात गेले होते.
याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून २२ हजार रुपये रोख व ४२ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम