कारागृहाच्या खिडकीचे गज फोडून पसार झालेल्या आणखी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  राहुरी कारागृह फोडून फरार झालेल्या तीन पैकी एकाच्या राहुरी पोलीसांनी आवळल्या मुसक्या आहेत. शनिवारी दुपारी मनमाड रेल्वे स्टेशनहुन राहुरीच्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.(arrest news)

जालिंदर गोरक्षनाथ सगळगिळे(टाकळीमिया, ता.राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या ५ आरोपींना राहुरी कारागृहातील ठेवण्यात आले होते.

पसार झालेले पाच आरोपी हे कारागृहातील चार नंबर कोठडीत ठेवण्यात आले होते. त्या कोठडीत एकूण आठ ते दहा आरोपी होते.

आज दिनांक १८ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजे दरम्यान सदर ५ आरोपींनी चार नंबर कोठडीत असलेल्या खिडकीचे गज कापून कोठडीतून पलायन केले. पलायन केलेल्या आरोपींमध्ये रविंद्र ऊर्फ रवी पोपट लोंढे(राहणार झापवाडी रोड, घोडेगाव)

जालिंदर गोरक्षनाथ सगळगीळे (राहणार टाकळीमियाॅ, राहुरी) सोन्या ऊर्फ नितीन मच्छिंद्र माळी( राहणार मोरचिंचाळे, नेवासा. सागर अण्णासाहेब भांड राहणार धवणवस्ती, वाणीनगर, सावेडी, नगर),किरण अर्जुन अजबे( राहणार नागरदेवळा, भिंगार) या ५ आरोपींचा समावेश होता.,

त्यापैकी सागर भांड व किरण अजबे या दोघांना रात्री गस्तीवर असलेल्या हवालदार रंगनाथ ताके, दिपक फुंदे, विकास साळवे, देविदास कोकाटे या पोलिस पथकाने पाठलाग करून राहुरी येथील नगर मनमाड रोड लगत पाण्याच्या टाकी जवळ पकडले.

तर इतर तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. नाकाबंदी करून देखील ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दरम्यान जालिंदर गोरक्षनाथ सगळगिळे याला मनमाड जंक्शन येथून पोलिस अजिनाथ पाखरे, सचिन ताजने यांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र बीजी शेखर पाटील जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे, उप विभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांनी राहुरी पोलिस ठाण्यात भेट देऊन माहिती घेतली.

तसेच प्रांताधिकारी दयानंद जगताप व तहसीलदार फसिओद्दीन शेख, पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी कारागृहाची पाहणी केली. कोठडीत असलेली खिडकी ही १२ ते १३ फूट उंच आहे. आरोपींनी कोठडीतून कसेकाय पलायन केले. हे कोडेच आहे.

सदर आरोपींना पळून जाण्यास बाहेरून कोणी मदत केली का? याचा शोध सुरू आहे. संशयित म्हणून काही जणांना ताब्यात घेऊन पोलिसांचा तपास सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News