अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच नगर अर्बन बँकेसाठीची निवडणूक पार पडली होती.
आता पारनेर नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या मतदानासाठी बुधवापासून (दि. १ डिसेंबर) अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला.

यावेळी प्रथमच निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया नगरपंचायत कार्यालयातूनच राबविण्यात येत असून मतमोजणीही नगरपंचायतीच्या ताब्यात असलेल्या हॉलमध्ये होणार आहे.
नगरपंचायत कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आज अर्ज दाखल करताना सादर करावयाच्या कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी सर्वच इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू असल्याचे चित्र होते.
दरम्यान अर्ज दाखल करण्यापूर्वी तो बिनचूक आहे की नाही यासाठीही स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. तसेच अर्जाच्या विविध कागदपत्रांची पुर्तता करून तो सुरूवातीस ऑनलाईन पध्दतीने दाखल करायचा आहे.
त्यानंतर त्याची छायाप्रत विविध कागदपत्रांसह नगरपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावयाची आहे. ही सर्व पुर्तता करेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत संपून गेल्याने पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम