संशयित म्हणून ताब्यात घेतला मात्र ‘तो’ निघाला अट्टल दरोडेखोर!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :-  संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो अट्टल दरोडेखोर असल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे एकजण संशयास्पदरित्या फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव विजय राजु काळे (वय २२ वर्षे, रा.उंबरगे ता.बार्शी जि.सोलापूर) असे सांगितले.

पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक धारधार कोयता सापडला. त्याला अटक केल्यावर अधिक चौकशीत यापूर्वी त्याच्यावर अकलुज, बार्शी,

इंदापुर, बारामती, मोहोळ पोलीस ठाण्यात त्याच्यावर चोरी, जबरी दरोडे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe