अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- श्रीगाेंद्यातील बेलवंडी फाटा येथे विक्री करण्याच्या उद्देशाने एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस कब्जात बाळगणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांनी पकडले.(arrest)
किरण अरुण दरेकर (वय ३३, रा. करंदी, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याच्याकडून गावठी कट्टा व चार जिवंत काडतुस,
असा एकूण २५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली.
किरण दरेकर हा बेलवंडी फाटा परिसरात कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्याला ताब्यात घेतल्यानंतर ताे ही कट्टा विक्रीसाठी घेऊन आल्याचे समाेर आले.
सहायक फाैजदार भाऊसाहेब काळे, पाेलिस कर्मचारी विजय वेठेकर, भाऊसाहेब कुरुंद, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार यांनी ही कारवाई केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम