अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील कात्रड येथे मच्छिंद्र ससाणे यांना नग्न करून त्यांच्या गळ्यातील उपारणाने त्यांचाच गळा आवळून तूला आता फाशी देऊन तळ्यात फेकून देतो. अशी धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली.
या बाबत महेश पठारे याच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मच्छिंद्र भाऊ ससाणे हे दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील कात्रड
येथील वजेश्वरी मंदिरा जवळ असताना आरोपी महेश मिनीनाथ पठारे याने मच्छिंद्र ससाणे यांना अर्वाच्य भाषेत बोलून शिवीगाळ करत धमकी दिली.
तसेच पूढे जाऊन कात्रड गावातील स्मशान भूमी जवळ आरोपी महेश पठारे याने मच्छिंद्र ससाणे यांना नग्न करून त्यांच्या गळ्यातील उपरणाने त्यांचाच गळा आवळून तूला आता फाशी देऊन तळ्यात फेकून देतो असे म्हणून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झालाय. मच्छिंद्र भाऊ ससाणे यांनी पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी महेश मिनीनाथ पठारे
याच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके हे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम