अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- आमचे घरचे लोक इथे राहतात. तूम्ही आप आपसात शिवीगाळ करू नका. असे म्हणाल्याचा राग आल्याने चार जणांनी मिळून देवीदास सरोदे यांना गज व लाकडी दांड्याने मारहाण केली.
ही घटना दिनांक ३० नोव्हेंबर रोजी राहुरी तालुक्यात घडलीय. या मारहाणीत देवीदास सरोदे हे जखमी झाले आहेत. राहुरी तालूक्यातील गुंजाळे येथील रहिवाशी असलेले देवीदास हरिभाऊ सरोदे वय ४५ वर्षे हे दिनांक ३० नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर उभे होते.
तेव्हा त्यांचे घराचे पाठीमागे या घटनेतील आरोपी एक मेकांना शिवीगाळ करीत होते. तेव्हा देवीदास सरोदे त्यांना म्हणाले की, आमचे घरचे लोक येथे राहतात. तुम्ही आपसात शिवीगाळ करु नका. असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला. त्यांनी देवीदास सरोदे यांना गज व लाकडी दांड्याने मारहाण केली.
त्यावेळी देवीदास सरोदे यांचा मुलगा व सुन हे भांडण सोडवण्यास आले. तेव्हा आरोपींनी त्यांना देखील मारहाण केली. असे सरोदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
देवीदास हरिभाऊ सरोदे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गिताराम रमेश तांबे, नितिन रमेश तांबे, रमेश सोपान तांबे तसेच ताराबाई रमेश तांबे सर्व राहणार गुंजाळे ता. राहुरी. या चार जणां विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुशांत दिवटे हे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम