बोगस बियाणांचा शेतकऱ्याला फटका… 25 लाखांचे झाले नुकसान

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- शेतकऱ्यांना तयार झालेल्या डाळिंबाच्या बागेवर फवारणी करण्यासाठी दिलेल्या बनावट औषधामुळे 9 एकर क्षेत्रातील डाळिंब बाग उद्वस्त झाली असून शेतकर्‍यांचे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान हा धक्कादायक प्रकार कर्जत तालुक्यातील गुरूपिंपरी येथे घडला आहे. या प्रकरणी प्रकाश गावडे व विनोद गावडे या शेतकर्‍यांनी तक्रार दाखल केली आहे.

या प्रकारानंतर कृषी विभगाने छापेमारी सुरू केली आहे. यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे संबंधित कंपनीच अस्तित्वात नाही आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गावडे यांचे डाळिंब तोडणीला अवघे वीस दिवस राहिलेले असताना फळांवर लाल बिंगी व कुजबा या रोगांचा प्रादूर्भाव झाला यासाठी त्यांना मिरजगाव येथील कृषी विक्रीच्या दुकानातून बायो नावाचे बुरशीनाशक औषध देण्यात आले.

शेतकर्‍यांनी याचीही फवारणी केली मात्र फवारणीनंतर अवघ्या आठ दिवसांत सर्व फळांची गळ होऊन तब्बल नऊ एकर डाळिंब फळे वाया गेली व या शेतकर्‍यांचे सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत दुकानदाराला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे गावडे बंधूंनी यासंदर्भात कर्जत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.

तक्रारीनंतर तालुका कृषी अधिकारी यांनी गावडे यांना पुरवठा केलेली औषधे त्यावरील कंपनी याची तपासणी केली. तसेच पाच कृषी दुकानांवर छापे टाकून तपासण्या केल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe