मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  शहरातील सावेडी रोड परिसरात असलेल्या जे. जे. डायबेटिज् अ‍ॅण्ड ओबेसिटी क्लिनिक’ येथे प्रथम वर्धापन दिनानिमित्त मोफत भव्य मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आज दि. 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे शिबिर होईल, अशी माहिती डॉ. ज्योत्स्ना जाजू-भराडिया यांनी दिली.

जे. जे. डायबेटिज् अ‍ॅण्ड ओबेसिटी क्लिनिक हे मधुमेह व लठ्ठपणा’वर यशस्वी उपचार करणारे हे शहरातील एकमेव क्लिनिक आहे. शिबिरात 1 हजार रुपयांपर्यंत सुविधा पूर्णपणे मोफत मिळणार आहेत.

शिवाय तज्ज्ञ डाॅक्टरांचे मार्गदर्शन, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, युरिक अ‍ॅसिड तपासणी, HbA1C, वजन तपासणी होईल. धूत काॅम्प्लेक्स, शाॅप नं. 10-11, हाॅटेल ओबेराॅय समोर, गायकवाड काॅलनी, नगर-मनमाड रोड, सावेडी, या ठिकाणी हे शिबिर होत आहे.

नाव नोंदणीसाठी 0241-2952681, 7020292681 या क्रमांकावर संपर्क साधावा. शहरातील जास्तीत जास्त गरजू रुग्ण व महिलांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. भराडिया यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe