‘हॉस्पिटलसाठी आठ हजार रुपयांची गरज आहे’…! माजी आमदाराच्या नावे बोगस फेसबुक अकाउंटव्दारे अनेकांना पैशाची मागणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांचे सोशल मीडियाचे फेसबूक अकाउंट नवीन तयार करून त्यावरून अनेक जणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मला हॉस्पिटलसाठी आठ हजार रुपयांची गरज आहे.

अशा प्रकारचे मेसेज पाठवण्यात आले.या प्रकरणी सायबर क्राईम अहमदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस मधील माजी आमदार व कुकडी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन तसेच जिल्हा बॅंकेचे संचालक यांचा सोशल मीडियाचे फेसबूक अकाउंट अज्ञात इसमाने नवीन डमी अकाउंट तयार करून, त्या अकाऊंटवरून अनेकांना पैशाची मागणी केल्याचा प्रकार घडला.

याबाबत याविषयी माजी आ.जगताप यांचे स्वीय सहाय्यक खंडू पवार, राहुल जगताप यांचे बंधू कालिदास जगताप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच अनेकांना फोन करून व्हाट्सअप वर याची बातमी शेअर करून अनेकांपर्यंत अकाउंट हॅक झाल्याची माहिती कळवली.

त्यानंतर माजी आमदार जगताप यांनी याबाबत अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर क्राइम या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe