अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- परिसरात गेल्या काही दिवसापासून शेती पंपाला पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नाही आठ तास वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी असताना देखील एक -दोन तास शेती पंपाला वीज पुरवठा होत आहे
सातत्याने वीज पुरवठा ट्रीप होत असल्यामुळे शेतकरी वैतागला असून शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा या मागणीसाठी परिसरातील विविध गावचे सरपंचासह विविध गावच्या शेतकऱ्यांनी मिरी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

एकीकडे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना रुपयाचे देखील उत्पन्न शेतीतून मिळाले नाही, असे असताना देखीलवीज वितरण कंपनीने पठाणी वसुली करत शेतकऱ्यांना वेठीस धरत ऐन पिके जोमात असताना वीज बिलाचे कारण पुढे करत वीज पुरवठा खंडित केला.
त्यामुळे शेतकऱ्याने उसनवारी करूत तर प्रसंगी कर्ज काढून पाच हजार रुपये शेती पंपाच्या थकबाकी पोटी भरले. जेणेकरून आता यापुढील काळात वीज पुरवठा सुरळीत होईल व शेतात उभी असलेल्या पिकाचे दोन रुपये हातात पडतील.
मात्र शेतकऱ्यांची ही अपेक्षा फोल ठरवत सुरळीत तर सोडा पण शेतकऱ्यांना दोन तास देखील पूर्ण दाबाने शेती पंपाचा वीज पुरवठा केला जात नाही.
ऊर्जा मंत्र्याच्या मतदारसंघातच शेतकऱ्यांना वीज टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आल्याने महावितरणकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप करत पाथर्डी तालुक्यातील मिरी या गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
यावेळी उपस्थित असलेल्यानीसबस्टेशनवरील ओव्हरलोड मुळे शेती पंपाला पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नाही असे गेल्या अनेक दिवसापासून सांगितले जाते मग सबस्टेशनमध्ये ओव्हरलोडचा ट्रांसफार्मर का बसवला जात नाही.
महावितरणने शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला नाही तर वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागू असे असा इशारा दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम