अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- मतदारसंघाच्या विकास कामांसाठी भरपूर निधी आणणे व सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला वेळ कमी पडतोय. त्यामुळे विरोधकांकडे लक्ष देण्यास मला वेळच मिळत नाही.
मात्र काही लोकांच्या डोक्यात नेहमी घाणेरडे व विकृत विचार येतात. त्यांना जनतेने डोक्यावर अपटवले तरी देखिल त्यांचे विचार बदलत नाहीत.
अशी कडवी टीका मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा नामोल्लेख टाळत केली. पाथर्डी तालुक्यातील एका विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा अथवा बदनाम करण्याचा प्रयत्न केले जात आहेत. परंतु जर आता असे पुन्हा झाल्यास विरोधकांनाही घराबाहेर पडण्याची हिंमत होणार नाही, अशा शब्दांत त्यांनाही उत्तर देऊ.
इतरांचे व्हीडिओ व्हायरल करून त्यांना बदनाम करण्यापेक्षा आपल्या तोंडामुळे आपले किती नुकसान झाले, याचे आत्मचिंतन करण्याची तुम्हाला गरज आहे.
एखाद्याने पाण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला म्हणून त्याच्यावर राग व्यक्त करणे, ही लोकप्रतिनिधीला न शोभणारी गोष्ट आहे. तुम्ही जर विकृत विचाराने केवळ विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास राहुरी तालुक्यातील तुमचे पण व्हीडिओ बाहेर काढण्याची वेळ येऊ देऊ नका. अशा तीव्र शब्दांत ना. तनपुरे यांनी विरोधकांना सुनावले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम