जिल्ह्यातील ‘या’ दोन तालुक्यातील संपादित जमिनीचा शेतकऱ्यांना मिळणार मोबदला

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यामधून कुकडी कालव्यांच्या वितरेकीसाठी संपादीत झालेल्या जमीनींचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहीती खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

यासंदर्भात माहीती देतांना डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील खेतमाळीसवाडी,चिंबळा सिरसगाव बोडखा, आणि कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी या गावातील जमीनीचे भूसंपादन कुकडी कालव्यांच्या वितरीकांसाठी करण्यात आले होते.

मात्र त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नव्हता. याबाबत सरपंच बाळासाहेब गांधी संजय कांडेकर सुरेश होले अमोल कांडेकर शहाजी हिरवे राजेंद्र म्हसके यांनीही याबाबत खा.डॉ विखे यांच्याकडे या प्रश्नाबाबत पाठपुरावा केला होता.

मंगळवारी दिशा कमिटीच्या झालेल्या बैठकीत खा.विखे यांनी या प्रलंबित प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी सादर झालेल्या प्रस्तावाबाबत लेखी आदेश काढून शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने जमीनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला

असल्याचे विखे पाटील म्हणाले. जमीनीचा मोबदला मिळण्याचा मार्ग सुकर झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाबद्द्ल शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe