अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- पाथर्डी शहरानजिक असणा-या माळीबाभूळगाव शिवारात कोंबड्यांची झुंज लावून त्यावर जुगार खेळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या जुगाऱ्यांवर पाथर्डी पोलिसांनी छापा टाकून याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. तर घटनास्थळाहून १० ते ११ जण फरार झाले आहेत.

घटनास्थळी पकडण्यात आलेल्या तिघांकडून १ लाख ६४ हजार १४० रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी करीम सय्यद सय्यद (वय २३, रा.अंगूरीबाग मोढारोड, औरंगाबाद), अनिस रफीक शेख (वय ३४ रा.लक्कडकोट, येवाला,ता.येवाला जि.नाशिक), ओंकार कैलास चव्हाण (वय २९, रा.गणेशपेठ पुणे, ता.जि.पुणे) यां ताब्यात घेतले आहे.
तर यात जप्त करण्यात आलेल्या कोंबड्याचा पंचासमक्ष पाथर्डी पोलिसांनी लिलाव केला, या लिलावात बोली लावून तो कोंबड्याचा लिलाव ५ हजार १०० रुपयांचा झाला.
या छाप्यात पंचासमक्ष पकडण्यात आलेल्यांकडून कोंबड्यासह रोख रक्कम, दुचाकी व मोबाईल असा एकूण १ लाख ६४ हजार १४० रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी सागर मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात ११ ते १४ जणांविरुध्द गुन्हा दाखल आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम