Ahmednagar Crime News : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Ahmednagarlive24 office
Updated:
Ahmednagar News

Ahmednagar News : पोलिस पाठीमागे असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीला स्कॉर्पिओ गाडीत बसवत तिच्यावर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पीडित मुलीच्या फिर्यादी नुसार २९ ऑगस्ट २०२२ रोजी फिर्यादी व साक्षीदार दुचाकीवरून जात असतांना गुन्ह्यातील आरोपींनी पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना तिच्या सोबत असणाऱ्या साक्षीदार याला पोलिस पाठीमागे असल्याचे सांगत

पीडित मुलीला स्कॉर्पिओ गाडीत बसवत साक्षीदार याला दुसऱ्या गाडीने नगर येथील बस स्टँडवर ये असे सांगुन त्याला गाडीतुन उतरुन दिले. रस्त्याने जाताना पीडित अल्पवयीन मुलीला गाडीत असलेल्या तिघांनी मुलीवर आळी पाळीने सामुहिक अत्याचार करत तिला ही घटना कोणाला सांगू नये

म्हणून धमकी दिली. या बाबत फिर्यादीचे वडील यांनी दिलेल्या श्रीगोंदा पोलिस स्टेशन गु.र.नं. ६६७/ २०२३ या गुन्ह्याचे अनुषंगाने दि.२६ एप्रिल रोजी दिलेला असुन सदर जबाबावरुन स्वतंत्र खबरी अहवाल नोंद करावा असे मत मा. न्यायालय व सरकारी अभियोक्ता यांचेकडुन प्राप्त झाल्याने पिडीतेचे जबाबावरुन श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe