अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- डाळिंबाच्या बागेवर रोग पडला होता. त्यामुळे शेतकऱ्याने त्यासाठी औषध फवारणी केली. परंतु ते औषध बनावट असल्याने संपूर्ण डाळिंबाची फळे गळून पडली.
यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याबाबत संबंधित शेतकऱ्याने तक्रार दाखल केल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कंपनीसह त्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथील शेतकरी प्रकाश गावडे व विनोद गावडे यांनी येथील कृषी केंद्रातून डाळींब पिकावर फवारणीकरिता औषधे खरेदी केली होती.
यामध्ये औषधे बनावट असल्याने डाळींब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.खरेदी केलेल्या बायोसुल या औषधाच्या फवारणीने झालेल्या नुकसानीच्या तक्रारी नुसार तपास होऊन बोगस कंपनी उघडकीस आल्याने दोघांवर खते औषधे नियंतत्रण कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केला आहे.
संबधीत बायोसुल नावाचे बनावट औषध पुरविणारे आणि विकणार नंदराज अहिरे यश ऍग्रो कन्सल्टन्सी, मिरजगाव तसेच हे औषध त्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देणारे लक्ष्मीकांत हुमे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













