इंदुरीकर महाराज म्हणतात: ‘पैशाला नव्हे तर सामाजिक बांधिलकीला महत्त्व द्या’

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळाल्या. त्यामुळे प्रत्येकाने माणुसकी जपण्याचे काम करा पैशाला नव्हे तर सामाजिक बांधिलकीला महत्त्व द्या. चांगलं काम करणाऱ्यांना समाज नेहमी सन्मान देतो.

त्यामुळे अशाच पद्धतीचे सामाजिक उपक्रम प्रत्येक गावातील तरुणांनी हाती घेण्याची गरज आहे. असे मत प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य महाराष्ट्रासह संपूर्ण जगाला हेवा वाटणारे असून छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातिधर्मातील लोकांना सोबत घेऊन रयतेचे राज्य स्थापन केले.

त्यांचे कार्य संपूर्ण जगातील अभ्यासकांनी अभ्यासले त्यानंतर त्यांना द ग्रेट छत्रपती या नावाने जगभरात ओळखू लागले. तरुणांनी देखील शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार पुढे नेण्याचे काम केले

तर सर्वसामान्य जनता देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe