मी कर्जत – जामखेडमधूनच विधानसभा लढणार अन् जिंकणार देखील…परंतु

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणुकीला दक्षिण मतदार संघातून विजयी होईल असा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देऊन त्याला निवडून ही आणण्याची जबाबदारी आमची आहे. तरी येत्या चार दिवसात तुम्हाला गोड बातमी कळेल.

कर्जत जामखेडच्या मतदारांनी व सर्वसामान्य नागरिकांनी मला कसे लढायचे आहे ते शिकवले आहे. त्यामुळे मी पुन्हा कर्जत जामखेड मधूनच विधानसभा निवडणूक लढवणार आणि तेही तुमच्या आशीर्वादाने निवडून ही येणार, असा ठाम विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. तालुक्यातील एका कार्यक्रमात आमदार रोहित पवार बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मी आणि खा.सुप्रियाताई सुळे ही निवडणूक लढविणार नाहीत, परंतु या दक्षिण लोकसभा मतदारसंघात तगडा उमेदवार देऊन त्याला भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत .

तसेच जामखेड कर्जत तालुक्यातील गोरगरीब जनतेवर जर कोणी अन्याय केला तर त्याची गय केली जाणार नाही. यावेळी आ.रोहित पवार यांचा अरणगावच्या ग्रामस्थांच्यावतीने सत्कार केला तसेच विविधविकास कामाचे निवेदन दिले.

ग्रामस्थ उपस्थित होते.सर्वसामान्य नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन मकर संक्रांतीच्या तिळगुळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. आमदार रोहित पवार यांनी विविध ठिकाणी विकास कामांची पाहणी करून कामे दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe