ना.राम शिंदे यांचे मनोज जरांगे पाटील यांनी केले मनभरुन कौतुक

Sushant Kulkarni
Published:

१ फेब्रुवारी २०२५ जामखेड : विधान परिषदेचे सभापती राम शिंदे चांगला माणुस,आहे, असे गौरव उद्गार मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. अंतरवली येथे आ.सुरेश धस हे उपोषण सोडण्यासाठी गेले होते.त्यावेळी मनोज जरांगे पाटील आ. प्रा. राम शिंदे यांच्या बद्दल बोलत होते.जामखेड तालुक्यातील चोंडीचे आहेत का असे विचारले असता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि चोंडीचा विषय निघाला.

महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सभापती ना. प्रा. राम शिंदे यांचे मनोज जरांगे पाटील यांनी तोंडभरून कौतुक केले.जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणारं नेतृत्व म्हणुन सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तबच झालं आहे.जातीपातीच राजकारण करणाऱ्यांना तसेच राजकीय स्वार्थासाठी जातीजातीत विष पेरणाऱ्यांना व समाजासाठी संघर्ष करणाऱ्या नेतृत्वांना जातीत अडकविण्याचा प्रयत्न करणारांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे.

त्यांनी मतदारसंघ आणि मतदारसंघातील सर्व जाती, धर्मांना सोबत घेऊन विकासाचं राजकारण केल.कायम तात्विक भुमिका घेऊन सर्वसामान्य जनतेशी घट्ट नाते जपले.राजकीय निवडणुकीत निवडुण येणं पराभुत होणं हा जरी आकड्याचा खेळ असला तरी अल्पशा मताने लागलेल्या निकालात पराभव झालेल्या नेत्याविषयी चांगला माणुस आहे अस बोललं जात असेल आणि तेही एका मोठ्या मंचावरून तर नक्कीच निवडुन आलेल्यांनाही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe