Ahmednagar News : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांनी चौंडीसह अनेक ठिकाणी सरकारी जमिनी लाटल्या असून त्यांच्या बगलबच्चांना दिल्या आहेत, असा आरोप भाजपचे नेते, माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे.
शिंदे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी हा आरोप केला. उद्या ३१ मे रोजी चौंडी येथे होणारा कार्यक्रम म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती नसून तो राष्ट्रवादीचा मेळावा आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला.
उद्याच मुंबईत सर्वसमावेशक जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.शिंदे म्हणाले, चौंडीत ग्रामपंचायतीची ८० एकर जमीन रोहित पवार यांनी एका संस्थेला हाताशी धरून हडप केली आहे.
याशिवाय तालुक्यात इतरही ठिकाणी गायरान आणि वन जमिनी अशाच पद्धतीने हडप करण्यात येत आहेत. उद्या चौंडीत होणारा कार्यक्रम हा जयंतीचा राहिला नसून त्याला राष्ट्रवादीच्या मेळाव्याचे स्वरूप आले आहे.
नातूनचे आजोबांना निमंत्रण दिले आहे. यासाठी ना कोणची जयंती समरोह समती आहे ना सर्वसमावेशक निमंत्रणे. त्यामुळे या कार्यक्रमाचे स्वरूप बदलून गेले आहे. आम्ही दर वर्षी येथे सर्वसमावेशक कार्यक्रम घेत होता. आता हाच कार्यक्रम आम्ही मुंबईत आयोजित केला आहे, असेही शिंदे म्हणाले.