कृषी पंपावर डल्ला मारणाऱ्या चौघांना कर्जत पोलिसांनी केली अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- शेतकऱ्यांच्या कृषी पंपांवर डल्ला मारून त्यांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या व हे पंप भंगारात विकुन मालामाल होणाऱ्या चार आरोपींवर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

यात दोन विधीसंघर्षित बालकांचाही सामावेश असुन कृषिपंप भंगारात विकत घेणाऱ्या एका भंगार व्यावसायिकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी, कर्जत येथील साईराज मोटार रिवायडिंग या दुकानाच्या पाठीमागील उघड्या असलेल्या गोडावुनमधुन ६० हजार रुपये किमतीच्या पाणबुड्या व इलेक्ट्रिक मोटारी दोन विधीसंघर्षित बालक आणि अजय आप्पा पानसरे (वय-१९,सर्व रा.राशीन ता.कर्जत)

आदींनी चोरून त्या इबारत मुस्तकीम शेख (वय-३०,रा.भिगवण ता.इंदापुर) या भंगार व्यावसायिकास विक्री केल्या. याबाबत राहुल आबासाहेब जांभळकर (वय-३० वर्षे रा.जांभळकरवस्ती,राशिन ता कर्जत)

यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अजय आप्पा पानसरे व इबारत मुस्तकीम शेख या आरोपींना अटक केली आहे. दरम्यान कर्जत पोलिसांनी आरोपींकडून ६० हजार किमतीचे कृषी पंप जप्त केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe