प्रलंबित पुलाअभावी ‘या’ ठिकणी वाहनांच्या अपघाताची मालिका सुरूच

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- करंजी घाटाचा पूल ओलांडला कि मराठवाडी हे गाव येते. या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून नवीन पुलाचे काम सुरु आहे. मात्र हे काम अद्यापही पूर्ण झाले नाही आहे.

यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागेल आहे. नुकतेच पाथर्डीकडून श्रीगोंदाकडे जाणारा उसाचा ट्रक या ठिकाणी उलटला.

यामध्ये ट्रकसह उसाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नगर-पाथर्डीमार्गे जात असलेल्या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम जांब कौडगाव ते पाथर्डीपर्यंत अनेक ठिकाणी अर्धवट असल्यामुळे कौडगाव, मराठवाडी, करंजी, देवराई, तिसगाव याठिकाणी महामार्गावर खड्डे पडलेले आहेत.

या खड्ड्यांमुळे वाहनांच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. दरम्यान मराठवाडी बारव जवळील पुलाजवळ खड्ड्यांमुळे पाथर्डीकडून श्रीगोंदाकडे जाणारा उसाचा ट्रक उलटला.

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहन चालकांना या महामार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार हा रस्ता अपघात मुक्त कधी होईल? असा प्रश्न प्रवासी वर्गांमधून विचारला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News