माझ्या आईप्रमाणे माझा देखील खून करतील… रेखा जरेंच्या मुलाची एसपींकडे धाव

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- नगर जिल्ह्यातील गाजलेले हत्याकांड म्हणजे रेखा जरे हत्याकांड याविषयी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. रेखा जरे हत्याकांडप्रकरणी जरे यांचे पुत्र रुणाल जरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे आपल्या जीविताला धोका निर्माण असल्याबाबत तक्रार केली आहे.

रुणाल जरे यांनी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 25 नोव्हेंबर रोजी दिल्ली गेट परिसरात एका व्यक्तीने रस्त्यात माझी गाडी अडवून मला धमकी दिली,

यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात मी तक्रार देखील नोंदवली आहे. माझ्या आईची हत्या एक वर्षांपूर्वी झालेली असून या घटनेने आमचे कुटुंब खचुन गेले आहे.

पाळत ठेवणारे व्यक्ती माझ्या आईप्रमाणे माझा देखील खून करतील अशी भीती मला व माझ्या कुटुंबियांना आहे. आमच्यावर पाळत ठेवणारे आरोपीचे नातेवाईक आहेत की मित्र किंवा इतर कोणी याबाबत आपण योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe