नागवडे व कुकडी कारखान्याची भूमिका ठरविण्यासाठी पाचपुते गटाची बैठक.

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना व कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर झाली.

या दोन्ही कारखान्याच्या निवडणुकीबाबत आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी उद्या (दि. १२) रविवारी महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीगोंदा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते यांनी माध्यमांना दिली.

काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे आमदार बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत प्रमुख नेते व कार्यकर्ते यांच्याशी पाचपुते चर्चा करणार असल्याचे पाचपुते यांनी सांगितले.

या संदर्भात माध्यमांना माहिती देताना भगवानराव पाचपुते म्हणाले, ” नागवडे सहकारी साखर कारखाना व कुकडी सहकारी साखर कारखाना दोन्ही कारखाने श्रीगोंदा तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत.

या निवडणुकी बाबत बबनराव पाचपुते यांच्या गटाने अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाही. आमदार बबनराव पाचपुते यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने याबाबत त्यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली होती.

सहकार प्राधिकरण ने नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.” बबनराव पाचपुते यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे. पाचपुते हे काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

बबनराव पाचपुते यांच्या गटाने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर निवडणूकीला वेगळी दिशा मिळेल. बबनराव पाचपुते यांनी या बाबत आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी कार्यकर्ते व सभासद वर्गाकडून जोर धरू लागली होती.

या सर्व बाबींचा विचार करता उद्या रविवारी सकाळी अकरा वाजता कुकडी कारखाना व दुपारी चार वाजता नागवडे कारखान्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन आमदार बबनराव पाचपुते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. तरी या बैठकीस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान भगवानराव पाचपुते यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe