अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- सध्या ब्राम्हणी परिसरात भेसळीचा मोठा गोरखधंंदा सुरू आहे. भेसळखोरांनी नवीनच शक्कल लढविली आहे. दूध संकलनासाठी नेत असतानाच वाहनातच त्यात भेसळ करण्यात येत आहे.
नुकतेच दूध भेसळीचा अहवाल आल्यानंतर राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील जालिंदर वने याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे अधिक माहिती अशी कि, तीन महिन्यापूर्वी वने याच्या वस्तीवर अन्न, औषध प्रशासनाने छापा टाकून दूध भेसळीबाबत कारवाई केली होती.
त्यावेळी दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आता त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित खात्याने ही कारवाई केली.
मात्र, गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच आरोपी पसार झाला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे ब्राम्हणी परिसरातील अनेक दूध भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
ब्राम्हणी परिसरात अनेक ठिकाणी राजरोसपणे दुधात भेसळ करून त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते.
त्यामुळे ब्राम्हणी परिसर दूध भेसळखोरांचा अड्डा बनला असून अद्यापही काही भेसळखोर अन्न व औषध प्रशासनाच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम