अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालूक्यातील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. त्यांना अद्याप तपास लागला नाही. तर आता अपहरणची तिसरी घटना समोर आली.
दरडगाव थडी येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली.
त्यात म्हटले आहे कि, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी रात्री सदर १७ वर्षे ४ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तिच्या राहत्या घरात झोपली होती. मध्यरात्री त्या मुलीच्या आईला जाग आली.
तेव्हा सदर मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. घरातील लोकांनी त्या मुलीचा परिसरात शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.
कोणीतरी त्यांच्या मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची त्यांची खात्री झाली. त्यानंतर त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरुध्द अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम