अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भर पावसात सभा घेऊन अशक्य निवडणूक जिंकून राज्यातील प्रतिष्ठांना धक्का दिला होता. आता याच पावसाची पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळते आहे.
नुकतेच कर्जत येथे भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी एक सभा झाली.
सभेला गर्दी जमलेली असतानाच पावसाचे दमदार आगमन झाले. तरीही दोन्ही नेत्यांनी सभा तशीच सुरू ठेवली. पाऊस सुरू असूनही दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्ते व समर्थकांची गर्दी कमी झाली नाही.
जिल्हाभर या सभेची चर्चा सध्या रंगली आहे. खासदार सुजय विखे म्हणाले, सध्या कोरोना काळात अनेक जण अडचणीत आहेत.
अशा परिस्थितीत लोकांचे घराघरात मनोरंजन व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकारने मंत्री नवाब मलिक व खासदार संजय राऊत या दोघांना नेमले आहे.
ते दोघे उठसूठ बडबडतात. यंदा सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यासाठी विशेषत: कर्जत तालुक्यासाठी यंदा काळी दिवाळी आहे.
महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई अजून दिली नाही. या सरकारला धडा शिकवण्यासाठी सज्ज रहा असे खासदार विखे यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम