नगर-मनमाड महामार्गावर खड्डे, आता होणार हा उपाय

Published on -

Ahmednagar Manmad Highway: रुंदीकरणाचे काम अर्धवट पडल्याने अत्यंत खराब झालेल्या नगर-मनमाड महामार्गासंबंधी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे तात्पुरता का होईना खड्यांपासून दिलासा मिळणार आहे. या रस्त्याची तात्पुरती दुरूस्ती करण्यात येणार असून त्यासाठी ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम ज्या कंत्राटदार कंपनीने घेतले होते, त्यांनी ते अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

जुनी निविदा रद्द करून नवीन काढण्यासाठी आणि पुन्हा काम सुरू होण्यासाठी मोठा अवधी लागणार आहे. अशा काळात त्या रस्त्याची दुरूस्ती कोणी करायची? हा प्रश्न होता.

त्यामुळे विखे यांनी पाठपुरावा करून विशेष बाब म्हणून आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यातून या रस्त्याची तात्पुरती दुरूस्ती केली जाणार आहे.

येत्या आठ दिवसांत हे काम सुरू होणार आहे. त्यानंतर तीन महिन्यात नवीन कंत्राटदारामार्फत राहिलेले रुंदीकरणाचे काम पुढे सुरू होणार आहे, अशी माहिती डॉ. विखे पाटील यांनी दिली.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe