शेवगाव :- पैठणकडे चाललेल्या टँकरची धडक बसल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. येथील क्रांतिचौकात बुधवारी सकाळी हा अपघात झाला. पोलिसांनी टँकरचालकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत गणेश राम दारकुंडे यांनी फिर्याद दिली आहे. टँकर क्रमांक एमएच १७ ए जी ३५१३ पैठणकडे जात असताना उजव्या बाजूचे चाक उत्तमराव काशिनाथ दारकुंडे (वय ८५, दादेगाव) यांच्या दोन्ही पायांवरून गेले. रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.