अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- जामखेड तालुक्यातील खर्डा येथे काल पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालून जबर मारहाण करून सोन्याचे दागिने व रक्कम असा एकूण ६६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
तर चोरट्यांच्या मारहाणीत एकजण जखमी झाले आहे. या घटनेबाबत माहिती समजताच अहमदनगर येथील एलसीबीच्या पथकाने श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले व घटनास्थळी तातडीने भेट देऊन चोरट्यांच्या तपासासाठी पथक रवन केले.
याबाबत माहिती अशी की, खर्डा येथील विकास उर्फ बाळासाहेब दत्तात्रय गोलेकर यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२२ जानेवारी रोजी पहाटे २ ते २.३० वाजेच्या दरम्यान गोलेकर यांच्या राहत्या घरात ४ चोरट्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला
व पत्नीच्या अंगावरील एक तोळा सोन्याचे मंगळसूत्र, सहा ग्रॅम वजनाचे झुंबर, साखळी व कुडके असा ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला.
यावेळी माझ्या खोलीला बाहेरून कडी लावली व वडील दत्तात्रय नामदेव गोलेकर यांना काठीने मारहाण केली. त्यानंतर आरडाओरड केल्याने चोरट्यांनी मुद्देमाल घेवून पोबारा केला.
चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत नामदेव गोलेकर जखमी झाले आहेत. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम