कांदा करपला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी, खांडगाव, लोहसर, आठरेकौडगाव या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली.

परंतु कांद्यावर करप्या रोग पडला आहे. त्यामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.

शासनाने कांद्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संभाजी कराळे, दादासाहेब वांढेकर,

सुनील वांढेकर, सोमनाथ फुलारे, गणपत चव्हाण, पाराजी वांढेकर,विकास खुडे, सुभाष वाढेकर, काशिनाथ कराळे या शेतकऱ्यांनी केली आहे.