अरेरे: शेजारच्या लोकांनी चारित्र्यावर शिवीगाळ जिव्हारी लागल्याने तिने घेतला ‘हा’ टोकाचा निर्णय

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- समाजात वावरताना अनेकदा शेजारच्या लोकांशी वाद विवाद, शिविगाळ असे प्रकार होतात. कधी कधी तरी ते विकोपाला जातात व मारामारी देखील होते.

परंतु शेजारच्या लोकांनी एका विवाहित महिलेला तिच्या चारीत्र्यावरुन केलेली शिविगाळ जिव्हारी लागल्याने हा अपमान सहन न झाल्याने थेट गळफास घेऊन आपली जीवनयात्राच संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना शेवगाव येथे घडली आहे.

संगिता आशिष परदेशी ( वय-३०) असे मयत महिलेचे नाव असून सदर महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

जमीर उर्फ गोटया रफीक शेख, त्याची पत्नी आसमा जमीर शेख व त्यांचा मुलगा शाकीर जमीर शेख असे त्या आरोपींचे नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी, वरील तिघांनी मृत महिलेस वारंवार तिच्या चारीत्र्यावरुन शिविगाळ केली होती. हा अपमान सहन झाला नाही. याबाबत त्या महिलेचा पती आशिष विजय परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe