अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 AhmednagarLive24 : भंगार गोळा करण्यासाठी के. के. रेंजमध्ये गेलेल्या दोघांनी लष्करी सरावादरम्यान मिस फायर झालेला बॉम्ब चोरून घरी आणला.
त्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी तो घराजवळ शेतात पुरून ठेवला होता. मात्र, याची माहिती पोलिस आणि लष्कराला मिळाली. लष्कराने तो बॉम्ब निकामी करून जप्त केला.
तर पोलिसांनी या दोघांच्या हाती बेड्या ठोकल्या. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील अमित संतोष गोंधळे व जय राम चौधरी काही दिवसांपूर्वी लष्कराच्या के. के. रेंज या प्रतिबंधित सराव क्षेत्रात गेले होते.
तेथे त्यांना लष्कराच्या सरावादरम्याम मिस फायर झालेला बॉम्ब सापडला. त्यांनी तो घराजवळील शेतात पुरून ठेवला. याची माहिती पोलिसांना आणि त्यांच्याकडून लष्करी अधिकाऱ्यांना मिळाली.
लष्कराच्या पथकाने शेतातून हा बॉम्ब शोधून काढला. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. सुमारे तीन महिन्यांपूर्वी के. के. रेंजमध्ये सराव झाला होता. त्यावेळी हा बॉम्ब पडेला होता.
तरुणांनी गावात आणून पुरलेल्या बॉम्बची गावात चर्चा झाली. ती पोलिसांपर्यंत गेल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्याविरूद्ध लष्करी जवान बंडू उत्तम येणारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
बॉम्बची चोरी केल्याचा तसेच स्वत:सह इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याचा गुन्हा त्यांच्याविरूद्ध दाखल करण्यात आला आहे.