२१ जानेवारी २०२५ सूपा : या समाजातील अनेक तरुणांनी विविध प्रकारची प्रशिक्षणे आणि व्यवस्थापनाचे कार्सेस करून या व्यावसायात व्यावसायिकता निर्माण केली.तसेच पूर्वीच्या दुकानापेक्षा हेअर सलून म्हणून त्यामध्ये विविध प्रकारच्या आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत ग्राहकांना आकर्षित केले,त्यामुळे या व्यवसायाला चांगले दिवस आले असले तरी महागाईची झळ या व्यावसायालाही बसत आहे.
त्यामुळे सलून व ब्युटी पार्लरच्या सेवेचा खर्च वाढला आहे.ब्लेड, क्रीम, पावडर व केसांचे विविध कलर यांच्या किमती दुपटीपेक्षा जास्त वाढल्या आहेत.त्यामुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळाने हेअर सलून व ब्युटी पार्लरच्या दरात २० ते ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.या नवीन दराची अंमलबजावणी १ जानेवारी २५ पासून सुरू केली असल्याचे नाभिक महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
काही महिन्यांपासून महागाई वाढली आहे.कच्चा माल, इंधन दरातही वाढ झाली आहे.सलून व ब्युटी पार्लरमध्ये आवश्यक असणाऱ्या साहित्याच्या दरात वाढ झाली आहे,त्यामुळे या सेवेचा खर्च वाढला आहे.वाढती महागाई, जीएसटी, इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, दुकानाचे भाडे, वीज बिल, कारागिरांचा पगार आदी आर्थिक विवंचनेत व्यावसायिक अडकला आहे.
दररोज वाढत असलेल्या महागाईमुळे दरवाढ करण्याची मागणी सलून व्यावसायिकांकडून करण्यात येत होती.सलून व्यवसायाशी निगडीत सर्वच घटकांमध्ये दरवाढ झाल्याने कमी दरात ग्राहकांना सेवा पुरविणे व्यावसायिकांना आर्थिकदृष्टया परवडत नव्हते,महागाईच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्र महामंडळाने १ जानेवारीपासून हेअर सलून व ब्युटी पार्लरच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा दरवाढीचा निर्णय राज्यातील शहरी नव्हे तर ग्रामीण भागातही लागू असणार आहे,असे महामंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.भारतीय समाज व्यवस्थेमध्ये बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार यांना अनन्यसाधारण महत्व होते.
या बारा बलुतेदारांमध्येच नाभिक समाजाचा समावेश होतो.पूर्वी धान्य व वस्तूंच्या मोबदल्यामध्ये वर्षभर दाढी-कटिंग केली जायची; परंतु काळाच्या ओघात या व्यवसायालाही आधुनिक स्वरूप आले आहे.नवीन दरानुसार साधी दाढी १३०, स्टाईल कटींग १५०, साधी दाढी ७०, तर स्पेशल दाढीसाठी ८० रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहे.