पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील भूमिपुत्र व मुंबईतील आयपीएस अधिकारी सुधाकर भानुदास पठारे (वय ५० वर्षे ) यांचे शनिवारी तेलंगणामधून परतताना अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने वाळवणे गावावर शोककळा पसरली असून सर्व ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत दुखवटा पाळला. रविवारी (दि.३०) दुपारी वाळवणे येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.पठारे हे प्रशिक्षणासाठी हैद्राबाद येथे गेले होते.
तेथे आपले नातेवाईक भागवत खोडके यांच्यासह जोतिर्लिंगच्या दर्शनासाठी जात आसताना त्यांच्या गाडीला मालमोटारीने समोरासमोर धडक दिली. त्यात त्या दोघांचाही मृत्यू झाला. घटना समजताच ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.गावातील कोणत्याही सामाजिक कामात त्यांचा सहभाग असायचा. अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांनी अर्थिक सहकार्य केलेले आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

* पठारे यांचा सेवा प्रवास
पठारे यांनी कृषी पदवी घेऊन शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून १९९५ मधे ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. त्यांनतर त्यांची विक्रिकर अधिकारी वर्ग १ म्हणून निवड झाली. १९९८ मध्ये पोलिस उपाधिकारी झाले. त्यानंतर पोलिस खात्यात चांगली कामगिरी केली,नंतर ते पोलिस उपाधीक्षक म्हणून पंढरपूर,कोल्हापूर येथे सेवा केली. सध्या ते मुंबई बंदर परिमंडळाचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते.