अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पारनेर तालुक्यातील २३ गावांमध्ये ५०० पेक्षा जास्त मेंढरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मेंढपाळ व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
झालेल्या दुर्घटनेचे लवकरात लवकर पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी होत आहे. दरम्यान आ. निलेश लंके मेंढपाळ कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष गणेश हाके यांनी सांगितले की,
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मेंढपाळ व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आ. निलेश लंके मेंढपाळ कल्याणकारी संघटनेच्यावतीने या मेंढपाळ व्यावसायिकांना मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आ. लंके यांनी तहसीलदार, पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अवकाळी पाऊस आणि रात्रभर सुरू असणाऱ्या वाऱ्यामुळे पारनेर तालुक्यातील रांधे, पाडळी आळे,
पळवे, पोखरी, वारणवाडी, पठारवाडी, कुरुंद, म्हसोबाझाप, खडकवाडी, वनकुटे, चोंभूत, शिरापूर, कातळवेढ, तिरकळ मळा, पुणेवाडी, पुणेवाडी फाटा,
सोबलेवाडी, किन्ही, कान्हूर पठार, कळमकरवाडी, पाडळी रांजणगाव, निघोज, पिंपरी विळद, मावळेवाडी या गावातील ५०० पेक्षा जास्त मेंढरांचा मृत्यू झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम