पारनेरचे आमदार निलेश लंके यांचा मोठा गौप्यस्फोट ! वकील आढाव दाम्पत्याच्या हत्येतील आरोपी….

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या गुन्हेगारीवर सत्ता पक्षातील नेत्यांकडूनही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या वकील आढाव दांपत्याच्या खुनातील आरोपींबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. जसे की आपणास ठाऊकच आहे की, राहुरी तालुक्यातील वकील राजाराम आढाव आणि मनीषा आढाव या दांपत्याचे अपहरण करून खून करण्यात आला होता.

दरम्यान, याच खुनातील आरोपी पोलिसांना धमकावत असल्याचा गौप्यस्फोट आमदार नीलेश लंके यांनी केला आहे. यावरून जिल्ह्यासहित संपूर्ण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थावर सर्वसामान्य जनता प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागली आहे. खरेतर, पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे गोळीबारांच्या या घटनेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, याच संदर्भातल्या पत्रकार परिषदेत आमदार निलेश लंके यांनी राहुरीतील वकील आढाव दाम्पत्याच्या हत्येत अटक असलेले आरोपी निर्ढावलेले आहेत. आम्हाला मारहाण केल्यास आम्ही तुमची न्यायालयाकडे तक्रार करू, असा दम त्यांनी पोलिसांना दिला होता, असे म्हटले आहे.

दरम्यान पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला आहे. त्यांनी ही घटना अतिशय निंदणीय असल्याचे म्हटले असून यामागे नेमका मास्टरमाइंड कोण होता ? याचा शोध लवकरात लवकर घेतला गेला पाहिजे अशी मागणी केली आहे. पोलिसांनी या घटनेतील मास्टरमाईंडचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केली आहे.

तसेच लंके यांनी आम्ही सुपा एमआयडीसीतील गुंडगिरी आणि दहशत गिरी संपुष्टात आणली आहे. परिणामी एमआयडीसीचा विस्तार झाला आहे. आता मात्र पुन्हा दहशत गिरी आणि गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान यावेळी लंके यांनी राज्यातील गृह खाते चांगले काम करत असून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करत असल्याचे म्हटले आहे. मात्र पोलीस प्रशासनाला कमी मनुष्यबळामुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe