अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- शिवाजीबापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नागवडे साखर कारखान्याने सभासदांच्या हिताचा विचार २६०० रुपये नगर जिल्ह्यात सर्वाधिक भाव काढला आहे. मात्र विरोधक बेताल आरोप करीत करून बदनामी करीत आहेत.
बेताल आरोप करणारे लई धुतल्या तांदळासारखे सारखे नाहीत. मी जर तोंड उघडले, तर या मंडळींना सभासद रस्त्यावर फिरू देणार नाहीत, असा इशारा नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिला.
नागवडे कारखान्याने नगर जिल्ह्यातील सहकारी कारखान्यांत नंबर एकचा बाजारभाव काढल्याने कारखान्याचे सभासदांनी राजेंद्र नागवडे यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस होते. नागवडे म्हणाले, बापुंनी साखर कारखानदारीत आयुष्य घातले.
परभणीला एक साखर कारखाना भागीदारीत घेतला. कराडला एका गुऱ्हाळात भागीदारी केली, ती भागादारी काढून घेतली. पण विरोधक नको, ते आरोप करतात. मग उद्या तुम्ही राज्यात तुम्ही अनेक हाॅटेल कशी घेतली. पण मला बोलायचे नाही, तो त्यांचा धंदा आहे, असा टोला केशवराव मगरांचे नाव न घेता मारला.
बाबासाहेब भोस म्हणाले, अण्णासाहेब शेलार हे मला अपात्र केले म्हणून टागोरा करीत आहेत. मात्र, शेलारांनी पाच वर्षात एकाही बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. प्रशांत दरेकर म्हणाले, आम्ही नेत्यासाठी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदावर पाणी सोडले. पण मध्यंतरी किरकोळ गैरसमज झाले ते आता मिटले.
यावेळी बाबासाहेब इथापे, दिनेश इथापे, अप्पा धायगुडे, बंडू पंधरकर, सुदाम कदम, हनुमंत झिटे, ॲड. रंगनाथ बिबे, निळकंठ जंगले, विठ्ठल गायकवाड यांची भाषणे झाली. प्रास्ताविक सुदाम नवले यांनी केले. सूत्रसंचालन सुनील जंगले यांनी केले. उपस्थितांचे आभार स्मितल वाबळे यांनी मानले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम