चक्क कोंबड्यांचे कुजलेले मांस, कचरा, रस्त्यावर…सुप्यातील रस्ते बनू लागले कचरा डेपो

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- एकीकडे देशामध्ये स्वछता मोहीम राबवल्या जात आहे तर दुसरीकडे आजही नगर जिल्ह्यातील काही ठिकाणीनागरिकांच्या बेशिस्त पणाचे दर्शन होत आहे.

कोठेही कचरा टाकणे व परिसर अ स्वच्छ ठेवणे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. नगर-पुणे महामार्गावर नगर ते सुपा आणि सुपा ते शिरूर दरम्यान सर्वच ठिकाणी हॉटेल व्यावसायिक, मांस विक्री करणारे, औद्योगिक वसाहतीचे टाकाऊ मटेरियल व काही केमिकल कंपन्यांतील टाकाऊ केमिकल रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला टाकून दिले जाते.

सुपा कामरगाव हद्दीच्या सीमेवर कुजलेले मांस टाकतात तर पवारवाडी घाट व जातेगाव घाटात नेहमीच खराब केमिकलचे टँकर खाली केले जातात.

विशेष करून सुपा-वाळवणे रस्त्यालगत शिवेवर खिंडीमध्ये सुका, ओल्या कचर्‍यासह घातक केमिकल रस्त्याच्याकडेला टाकण्यात येत आहे. महामार्गाच्या स्वच्छतेकडे ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष, नाही ठेकेदार कंपनीला काही देणेघेणे.

सुमारे 20 ते 22 गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा शहरात येण्यासाठी वाळवणे रस्ता हा मुख्य रस्ता आहे.या रस्त्याच्याकडेला गेले दोन वर्षांपासून कोंबड्यांचे कुजलेले मांस यासह इतर ओला व सुका कचरा टाकला जातो.

या रस्त्यावरून शाळेत जाणारे विद्यार्थी,शेतकरी, कंपनी कामगार, व्यावसायिक, दूध उत्पादक, यासह विविध गावांतील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो.

मात्र या कचऱ्याच्या समस्यांमुळे मानवी आरोग्यासह जनावरे आणि पशु पक्षी यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व ठिकाणच्या कचर्‍याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe