राळेगण सिद्धीच्या सरपंचाचा राजीनामा ‘यांची’ बिनविरोध निवड

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  राळेगणसिद्धीचे सरपंच डॉ.धनंजय पोटे यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी आज निवड प्रक्रिया झाली. निवडीसाठी मंडलाधिकारी कोळी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी लाभेष औटी यांची सरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. राळेगणसिद्धीसह परिसराला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा मानस राळेगणसिद्धीच्या नवनिर्वाचित सरपंच लाभेष औटी यांनी आपल्या निवडीनंतर व्यक्त केला.

लाभेष औटी हे राळेगणसिद्धीचे दिवंगत सरपंच गणपतराव औटी यांचे ते चिरंजीव आहेत. गणपतराव औटी हे अण्णा हजारे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते.

निर्वाचित सरपंच लाभेष औटी यापुढे अण्णांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेऊन ग्रामविकासाचे कार्य करण्याचा निर्धार नवनिर्वाचित सरपंच लाभेष औटी यांनी संपूर्ण राळेगणसिद्धी व परिसर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे.

लवकरच अण्णांच्या मार्गदर्शनाखाली २५ मेगावॅट प्रकल्प उभा करणार आहे. यापुढील काळात शेतकऱ्यांना विजेची कोणतीही समस्या जाणवणार नसल्याचा आशावाद व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe