अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- तलावातून शेतकर्याची पानबुडी मोटार चोरल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Submarine motor theft)
सुमित आबासाहेब जमदाडे, रवी शिवाजी उदमले (दोघे रा. पिंपळगाव लांडगा ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

शेतकरी ज्ञानदेव भानुदास कुमटकर (वय 47 रा. पिंपळगाव लांडगा) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपींनी पिंपळगाव लांडगा येथील जांब तलावातून पाच हजार रूपये किंमतीची पाच एचपी पॉवरची पानबुडी मोटार चोरली असल्याचे कुमटकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक सय्यद करीत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम