अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- कॉलेजला दुचाकीवर जात असलेल्या दोन मित्रांना टँकरने धडक दिली. या धडकेत गोपाल अभिमन्यु सोनवणे (रा. शेंडगाव ता. श्रीगोंदा) याचा मृत्यू झाला.
तर सुयोग शिवाजी शेळके (वय 21 रा. जुने दहिफळ ता. शेवगाव) हा जखमी झाला आहे. अहमदनगर शहरातील कोठी चौकात हा अपघात झाला.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/07/dead-body-860x573_1200x768_120_1200x768.jpeg)
गोपाल व सुयोग हे दोघे मित्र कोठी चौकाकडून मार्केट यार्ड मार्ग आनंदधामकडे जात असताना कोठी चौकाजवळ पाठीमागून येणार्या टँकरवरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील टँकरची धडक दुचाकीला दिली.
या धडकेत जखमी झालेल्या गोपाल व सुयोग यांना अहमदनगरमधील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील गोपालचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी सुयोग शेळके याने फिर्याद दिली आहे.