बेलवंडी फाटा येथे गावठी कट्टा व चार काडतुसासह आरोपीला अटक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी फाटा येथे एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ताब्यात घेतले.(arrest)

किरण अरुण दरेकर (३३, करंदी, ता. शिरूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशावरून १७ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खबऱ्याकडून बेलवंडी ते श्रीगोंदे रोडवर,

बेलवंडी फाट्याजवळील साई गार्डन हॉटेलसमोर बेकायदेशिररित्या गावठी कट्टा बाळगून विक्री करण्याचे उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीनुसार खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

माहितीच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सापळा लावून संशयित नजरेने टेहळणी करीत असलेल्या इसमाला घेराव घालून ताब्यात घेतले.

अधिक विचारपूस करत तपासणी केली असता त्याने किरण अरुण दरेकर शिरूर येथील असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता एक गावठी कट्टा व चार जिंवत काडतुसे असा एकूण २५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करून त्याला ताब्यात घेतले.

बेलवंडी पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कार्यवाही बेलवंडी पोलिस ठाणे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe