Shrigonda News : घनश्याम शेलारांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

Published on -

Shrigonda News : पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग येऊन अनिल वसंत सोमवंशी (रा. शिरसगाव बोडखा) याने बीआरएसचे नेते घनश्याम शेलार यांच्या मुलाला घरी जाऊन शिवीगाळ करत दमदाटी तसेच धक्काबुक्की करत तलवारीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात प्रवीण शेलार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी अनिल सोमवंशी याला अटक केली.

याप्रकरणी शेलार यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनूसार शिरसगाव बोडखा येथील अनिल सोमवंशी याचे त्याच्या पत्नी सोबत झालेल्या घरगुती वादात बीआरएसचे नेते घनश्याम शेलार यांच्या मुलाने मध्यस्ती करत त्यांचा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.

या गोष्टीचा राग येऊन आरोपी अनिल सोमवंशी याने १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शेलार यांच्या वडळी येथील घरी दारु पिऊन जात फिर्यादी यांना पती-पत्नीच्या घरघुती वादामध्ये का पडता असे म्हणुन शिवीगाळ करत दमदाटी करुन फिर्यादीस धक्काबुक्की केली.

तसेच तलवारीचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी देवून आमच्या भांडणात परत मध्ये आले तर मी तुला तलवारीने कापुन टाकीन अशी धमकी दिली.याप्रकरणी अधिक तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe