Ahmednagar News : हृदयद्रावक ! ऊसतोडणी सुरु होती.. बिबट्याने ऊसतोड कामगाराच्या मुलीवर घेतली झेप,पोटचा गोळा गेला

Published on -

बिबट्याची सध्या जिल्हाभर विविध तालुक्यांमध्ये दहशत दिसते. आता एक हृदय द्रावक घटना समोर आली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील अजनुज गावच्या शिवारात ऊस तोडणी सुरू असतांना बिबट्याने अचानक हल्ला केला.

या हल्ल्यात ऊसतोडणी कामगाराची तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. लक्ष्मी गायकवाड (३ वर्षे) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. ऊसतोड कामगारावर मोठे दुःख कोसळले आहे.

शुक्रवारी सायंकाळी अजनुज येथे एका हॉटेल मागे असलेल्या मजुरांच्या राहोटी बाहेर खेळत असलेल्या तीन वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात तिच्या डोक्याला, मानेला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्यामूळे ती मुलगी मयत झाली आहे. चाळीसगाव येथून मजुरीसाठी श्रीगोंदा कार्यक्षेत्रातील कारखान्यावर ऊस तोडणीस आलेल्या गायकवाड यांच्या कुटुंबावर या दुर्दैवी घटनेने

मोठा आघात झाला आहे. या घटनेमुळे या परीसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक वन परिक्षेत्र अधिकारी श्रीगोंदा आणि कर्जत यांच्या संयुक्त अजनुज गावात घेतलेल्या ग्रामसभेत लोकांना खबरदारीच्या उपाययोजनांबाबत माहिती देत सतर्कतेचे आवाहन केले आहे.

तसेच पिडित कुटुंबाला २५ लाख रूपयांची शासनाची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. घटनास्थळी वन विभागाचे फिरते पथक, वन अधिकारी, कर्मचारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe