Shrigonda Crime : मयत इसमाच्या नावाने बनावट मृत्यूपत्र तयार करत खोट्या मृत्यूपत्राचे आधारे सातबारा व फेरफार नोंदीत बदल करून फसवणूक केल्या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात अगस्ती पुंडलिक बोराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला
प्रदीप बाजीराव उदार, तुकाराम वामन ढगे, महेश जनार्दन ढगे तिघे (रा.चाभुर्डी), गोरख पोपट भवाळ (धालवडी ता. कर्जत), संपत जगताप, राजू तुकाराम जगताप (दोघे रा. कोळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भाऊ विजय बोराडे हा मयत झाल्यानंतर फिर्यादीच्या भावाचा अंत्यविधी आरोपींनी पोस्टमार्टम करून न देता अंत्यविधी करण्यास सांगत फिर्यादीच्या भावाचे नावावरील जमिनीचे बनावट मृत्युपत्र तयार केले.
त्या मृत्युपत्रावर आरोपींनी फिर्यादीचे भावाची बोगस सही करत संगणमताने फिर्यादीच्या भावाची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला. खोट्या मृत्युपत्राचे आधारे सातबारा व फेरफार याच्यावर नोंदी करून जमिनीची नोंद आरोपी गोरख पोपट भवाळ (धालवडी ता. कर्जत) याच्या नावे करत.
फिर्यादीची ठकबाजी करून फसवणूक केली. तसेच आरोपी प्रदीप उदार याने फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करत गावात राहण्यास मज्जाव करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बेलवंडी पोलिस करत आहेत.