बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षाचा मुलगा जखमी; या ठिकाणी घडली घटना

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी येथे ऊस तोडणी मजुरांनी थाटलेल्या राहुटीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

या हल्ल्यात रुद्र ज्ञानेश्वर कांबळे (रा. सिल्लोड) हा तेरा वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नागवडे साखर कारखान्याची ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांची राहुटी नितीन नलवडे यांच्या शेतात आहे.

जखमी रुद्र यास नितीन नलवडे यांनी तातडीने काष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. पण जखम मोठी असल्याने उपचारासाठी नगर येथील सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यानच्या काळात बिबट्याने शहाजी थोरात यांच्या गायीचे वसरु जखमी केले केले. दरम्यान बिबट्याचा हल्ला हा आनंदवाडी परिसरात चिंतेचा विषय बनला आहे. यावर तातडीने उपाय करण्यात याव्या अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe