अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- अनेकदा मागणी करून ही शिक्षक मिळत नसल्याने कर्जत तालुक्यातील कोरेगाव जवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजपूतवाडीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांंच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले.
कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजपूतवाडी येथे पहिली ते चौथी या चार वर्गात ११० विद्यार्थी संख्या असून सध्या अवघे दोन शिक्षक गेली अकरा महिन्यापासून ही शाळा सांभाळत आहेत, या शाळेचे मुख्याध्यापकांचे कोरोनाने निधन झाल्या नंतर त्याच्या जागेवर इतर शिक्षक देण्यात आलेला नाही.
९१ पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेस चार शिक्षक आवश्यक असतात मात्र या शाळेत अनेक दिवसांपासून दोन शिक्षक कार्यरत आहेत.
याबाबत अनेकदा शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाला लेखी निवेदन देऊन शिक्षक मागणी केली आहे मात्र शिक्षण विभाग त्याकडे दुर्लक्ष केले.
गेली दोन वर्षांपासून कोरोनाने मुलांचे मोठे नुकसान झालेले असताना पुन्हा दोन शिक्षकांच्या कमतरतेमुळे उपस्थित दोन शिक्षकांची मोठी कसरत होत असून यामध्ये मुलांचे मोठे नुकसान होतच असल्याने ग्रामस्थांनी शाळाच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी सर्व पालकांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम