अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- सक्तीची वीज बिल वसुली थांबविण्यात यावी. खंडित करण्यात वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत सुरू करावा.
या मागणीसाठी ढोकेश्वर अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील शेतकऱ्यांनी टाकळी ढोकेश्वर येथील महावितरणच्या कार्यालयावर तब्बल सहा तास ठिय्या दिला.
यावेळी परिसरातील विविध गावचे चारशे ते पाचशे शेतकरी उपस्थित होते . सकाळी ११ वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी पाच वाजता स्थगित करण्यात आले.
महावितरण टाकळीढोकेश्वर विभागातील सर्व गावांतील खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत सुरू केला व यापुढे अशा रीतीने एकतर्फी वीज तोडण्याची कारवाई महावितरणकडून केली जाणार नाही,
शेतकरी कार्यकर्ते व महावितरणचे प्रमुख अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन त्यात जो काही वीज बिलाबाबत निर्णय होईल त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक वाघ यांनी यशस्वी मध्यस्थी केली. मात्र जर महावितरणने विश्वासघात करून पुन्हा मनमानी केल्यास
पारनेर येथे शेतकऱ्यांचा महा ट्रॅक्टर मार्च काढण्याचा गर्भित इशाराही आंदोलकांनी आंदोलन स्थगित करताना दिला आहे.त्यामुळे राज्यात सध्या महावितरण विरुद्ध शेतकरी असे चित्र निर्माण झाले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम